Thursday 10 September 2015

The Climber

"CLIMBER" क्लाईंबर

My shadow define my identity..!
         जगातला एकमेव विचित्र प्रणी...! म्हणजे तसा विचित्र नाही हो...सतत कोणत्या ना कोणत्या विचारात मग्न..! कधी घरच्यांच्या तर कधी मित्रांच्या आणि सतत डोंगरांच्या, कडे, सुळके, क्रँक, कातळ भिंती यांच्या विचारात असणारा हा दुर्मिळ प्रणी... मनाने तसा फार श्रीमंत.. प्रत्येक गोष्टीकडे काहीतरी वेगळ्याच दृष्टीकोनाने बघणारा.. डोंगरात फिरताना ह्याचे लक्ष खाली पायवाटेकडे कमी आणि वर कड्यांकडे, कातळभिंतीकडे  जास्त...का तर कुठे काही गणित जुळतंय का? हे पाहण्यासाठी...! आणि तसं काही दिसलचं तर स्वत:च्या दुनियेत रमणारा..मनात थोडीशी भिती आणि प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द आसणारा हा प्राणी म्हणजे Climber..!
Look up..!

Yup..! That's  the right way..! Go man..!
इतरांपेक्षा थोडा वेगळा..जिद्दी..! जिथे जाईल तिथे माकड उड्या/लटकणे (कला) सुरु.. स्वस्थ कधी बसणार नाही...
The world are spot to climb..!
मोहीमेला निघताना एक विशिष्ट प्रकारचं तेज चेह-यांवर असणार... जास्त बडबड नाही.. पाहीजे तितकच बोलणारं.. असेल त्यात समाधान..  Climbing ला सुरुवात करताना सुळक्याला नमस्कार करणांर...गा-हाणे घालणार.. संपुर्ण टिम कडे लक्ष ठेवणारं..
Preyer
climbing चालू असताना मनात दुसरा कोणताच विचार नाही.. फक्त climbing, summit, team & windup या चार गोष्टींकडे मात्र काटेकोरपणे लक्ष.. अगदी हसत खेळत climbing ची मजा घेणार...मध्येच एखादा विनोद, गाणी तर कधी बेस टिम शी संवाद साधणार...
Climbing is fun..!
Enjoy the moment..!
पार्टनर ला प्रोस्ताहन करणार.. कठीण पँचला मात्र ह्यला घरचे मोठे, लहान, जिवलग, सखे सोबती हमखास आठवणार.. एक दोन fall घेऊन सुध्दा स्वत:ला प्रवृत्त करणार, प्रेरणा देणार आणि पँच clear करणार...समीट झाल्यावर एक प्रकारचं समाधान चेह-यावर...
Summit..!

आजुबाजूचा परिसर डोळ्यात साठवणारं...पुढचं Target काय असेल व त्यासाठी किती मेहनत घ्यायची याचा डोक्यात विचार चालू असणारं... परतीच्या प्रवासाला मात्र सुळक्याकडे बघत.. "पुन्हा येतो रे बाबा..आसाच अंगा-खांद्यावर खेळवत रहा...!" असं म्हणतं नम्र अभिवादन करुन एक सलाम ठोकणारं..!
Looked after climb and remind all the all moves n situations..!
हे सगळं करुन आल्यावर घरच्यांच्या शिव्याही  खाणारं.. का तर फोन करुन कळवले नाही म्हणून..हे दरवेळीच आहे हो...घरच्यांना पण काळजी असते...उलट उत्तर न करता सगळं मुकाटपणे एैकायचं आणि शांत रहायचं..! घरचे म्हणतात काय मिळत तिथं जाऊन कुणास ठाऊक हे एैकल्यावर ह्याच उत्तर ठरलेले असतं.. सगळं कही आहे कधी येऊन तर बघा...!
Mountain lover..!
Fearless...! Feel the freedom...!
एवढं सगळं झालं तरी मोठेपणा नाही किंवा मीपणा नाही...फार फार तर आपल्या जिवलगांना, field मधील मित्रांना व सिनियर्स ना मोहीमेबद्दल सांगणार...क्वचित एखादा असेल जो घरच्यांना सांगत असेल..!
Happy faces after successful climb...! Sign of achievement..✌
काही जण विचारतात...हे सगळं करताना भिती नाही वाटत का..? भिती तर खुप वाटते... पण शेवटी या दगडानेचं शिकवलयं आम्हाला दगडासारखं कठोर बनून जगायला..! माघार घेणे नाही... समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे... स्वत:वर आलेलं संकट/कठीण प्रसंग स्वत: कसं पेलायचं हेच दगडाने शिकवलयं..

Practice hard..!


Life is balance..!
दिसण्यावर जाऊ नका ओ... दिसताना जरी कठोर दिसलो तरी आम्ही ही शेवटी माणुसचं.. आम्हाला ही मनं आहे... भावना आहेत... पण फक्त त्या व्यक्त करता येत नाही... किंवा करत नाही असं म्हटलं तरी चालेल.. कोणासमोर व्यक्त करायच्या हा प्रश्न पडतो..मग वाटतं नकोच कोणाला सांगायला... दगडा सारखचं राहूया.. काय फरक पडतोय.. अह,पण दगडालाही "पाझर" फुटतो...असो..!


          डोंगर म्हणजे याचा जिव की प्राण.. एक वेळ जेवायला नाही दिलं तरी चालेल पण डोंगर मात्र हवा... कधी एकदा तो शनिवार-रविवार येतोय अन् डोंगरात पळतोय असं वाटत असतं.. एखादा चुकलाचं तर जिव कासावीस होतो.. घुसमटल्या सारखं होत.. हा फक्त climbing च करतो असं नाही.पावसाळ्यात राहीलेले अँडवेन्चर ट्रेक पुर्ण करुन घेणार ..
Trek diaries..!

Explore more...!
त्याच बरोबर दस-या नंतरच्या climbing मोहीमांच नियोजन करणारं... कधी एकदा दसरा येतोय आणि climbing चा श्री गणेशा करतोय याची चाहुल लागलेली असते...!
सिमोल्लंघन...!
सगळेचं जण हल्ली सह्याद्री, भटकंती, किल्ले, ट्रेकर या विषयांवर लिहीत असतात...मला या विषयांवर लिहावसं वाटलं...जे काही थोडं सुचलं ते तुमच्यासमोर सादर.. एकंदरीत काय तर ही आहे climber ची life style..
Climber's hand...!
Climbing - it leaves you speechless, then turns you into a stroyteller..!

I am proud to be a Climber...never give up.. dream big..fly high..grow more.. travel more.. climb more...achieve heights.. #Climbers_life...!

                                                   राहुल खोत.                                                                  10-09-15